फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
आज फैजपूर शहरात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरातील सामाजिक कार्यकर्ते वसीम जनाब व मुदस्सर जनाब यांच्या पुढाकाराने व माजी नगरसेवक शेख जफर व माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रैली ची सुरुवात झाली शहरातील खुशाल भाऊ रोड, न्हावी दरवाजा, इस्लाम पुरा,लक्कड पेठ,हजीरा मोहल्ला, मोठ्या पाण्याची टाकी, हनुमान मंदिर, कुरेशी मोहल्ला सह शहरातील मुख्य रस्त्यावर फिरत परत सुभाष चौकात येऊन रैली चे समापन झाले शहरातील युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .[ads id="ads1"]
रैली चे आयोजन वसीम जनाब मित्र परिवार व मुदस्सर जनाब युवा मंच तर्फे करण्यात आला होता.माजी प्रभारी नगराध्यक्ष कुरबान शेख, लिमरा फाऊंडेशनचे अध्यक्ष वसीम जनाब,न्यु खिदमते मिल्लत फाऊंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र, अन्वर खाटीक,फारुक अब्दुल्ला, उपस्थित होते.[ads id="ads2"]
जफर अली, शेख मोहसीन, शेख जावेद, सुलतान भाई,अम्मो भाई, गुड्डू भाई, मोहसीन इंजिनिअर, वाजिद खाटीक मोहसीन बागवान, यांनी परिश्रम घेतले



