ग्रामसेवक मिळत नसल्याने प्रशासकीय अधिकारि उपस्थित
यावल- प्रतिनिधी | फिरोज तडवी : तालुक्यातील कोरपावली गावात झालेल्या ग्रामसभेत एक गाव एक गणपती हा विविध विषयांवर आधारित मर्यादा घालण्याचा निर्णय महिला व पुरुषांच्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला सभेच्य सचिव पदी प्राथमिक शाळा मुख्यद्यपक धनराज कोळी,अध्यक्षपदी सरपंच विलास अडकमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला सुरूवात करण्यात आली.[ads id="ads1"]
ग्रापंचायतीचे दुर्दैव म्हणजे ग्रामसेवक मिळत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांना यांच्या आदेश्यने गावाच्य सर्वांगीण विकासाकरिता जिप मुख्याध्यापक यांच्या उपस्थित ग्रामसभा घेण्याचे आदेश देत सभेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads2"]
गावातील ग्रास्थांनी सुरुवातीलाच महिलांनी पुढाकार घेत घरकुल योजना व गटारी , या संदर्भात ग्राम सभा गाजली, तरी सरपंच यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून त्यांना समाधान करक उत्तरे देऊ प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले,ग्राम पंचायत कडून अनेक वर्षा पासुन न झालेली कर वसुली, विविध शासकीय योजना पासून आदीवासी बांधवांना मिळणार्या योजनांचा लाभाची माहिती देणे अशा विविध लोकहिता च्या मुद्यांवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत माहिती देण्यात आली.
गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातुन कर वसुली होत नसल्याचे सांगण्यात आले, अनेक प्रश्नांना ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपस्तीत मंडळी सरपंच विलास अडकमोल, मुख्यापक धनराज कोळी, सदस्य सत्तार तडवी, आरीफ तडवी, सौ अफशान तडवी, दीपक नेहेते, आफ्रोज पटेल, मूनाफ तडवी, सुनिल आडकमोल, लिपीक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी, नबाब तडवी, अविनाश अडकमो ल सुपडू तडवी यांच्यासह महिला व तरूण पिढीने सभेस उपस्थित राहून ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, सभेस गालबोट लागू नये म्हणून यावल पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ, राजेंद्र पवार, पो कॉ अनिल पाटील, त्यांचे सहकारीसंतोष बडगुजर यांच्या उपस्थित सभा शांततेत पार पडली.


