भुसावळ ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका शाखा, वार्ड शाखा नालंदा नगर मैत्रेय बुद्ध विहार येथे महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज झाला. शिबीराच्या प्रमुख केंद्रिय शिक्षिका व जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग प्रमुख प्रियंकाताई अहिरे यांनी दहा दिवस महिला उपासिका यांना धम्म प्रशिक्षण दिले.[ads id="ads1"]
या ठिकाणी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रसंगी आदरणीय प्राध्यापक आनंद ढिवरे सर जिल्हा सरचिटणीस भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व, आदरणीय शैलेंद्र जाधव गुरुजी जिल्हा कोषाध्यक्ष, आदरणीय प्रियंकाताई अहिरे जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग, आदरणीय मेजर युवराज नरवाडे गुरुजी जिल्हा सचिव पर्यटन विभाग, [ads id="ads2"] आदरणीय ए टी सुरडकर गुरुजी जिल्हा सचिव संरक्षण, आदरणीय एस पी जोहरे जिल्हा सचिव संरक्षण विभाग, आदरणीय प्रविण डांगे गुरुजी तालुका अध्यक्ष भुसावळ, आदरणीय कैलास सपकाळे गुरुजी वार्ड शाखा अध्यक्ष, आदरणीय लताताई तायडे वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका, आदरणीय सीमाताई अहिरे केंद्रीय शिक्षिका, या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते शिबिरातील सर्व सन्माननीय महिला उपासिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सरणत्तय घेऊन करण्यात आला.



