साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साळव्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) साळवा तालुका धरणगाव येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रमुखवक्ते म्हणून व्हि टी माळीसर धरणगाव यांनी सांगितले की अण्णा भाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कविता, कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि कलापथके सादर करून समाज प्रबोधनात्मक जनजागृती घडवून आणली व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या क्रांतिकार्याची झलक उभ्या जगाला दाखवून दिली.[ads id="ads1"] 

   यावेळी साळवे इंग्रजी विद्यालयाची विद्यार्थिनी भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रणाली नारखेडेने उत्तम प्रबोधनात्मक भाषण सादर केले. तिचाही सत्कार केला. कार्यक्रमाला  प्रमुख अतिथी म्हणून श्री एस डी मोरेसर उपस्थित होते. त्यांनी प्रास्ताविकात साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जीवन परिचय करून,ईतिहास सांगितला.    [ads id="ads2"] 

                     याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोरख थोरात, उपाध्यक्ष विजय अहिरे रवींद्र अहिरे, प्रतिभा अहिरे, रोहिदास अहिरे, मनोज देवरे श्री सपकाळे, नवल चव्हाण, वैभव सपकाळे, चंद्रकांत अहिरे आणि साळव्यातील  ग्रामस्त नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय अहिरे यांनी

केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!