जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या कंत्राटदारांची महत्वाची बैठक शनिवारी सकाळी दहा वाजता पदमालय विश्राम गृह जळगांव येथे संपन्न झाली. [ads id="ads1"]
बैठकीस वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रकाश सरदार हे अध्यक्ष स्थानी होते. प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष प्रकाश तायडे, कोषाध्यक्ष मन साराम कोळी, सहसचिव नारायण झटके, विजय बागुल, अजीत सपकाळे, नितीन पाटील, पंकज इंगळे, गौरख ठोसर इत्यादी कंत्राटदार यांनी मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
शासन निर्णय नुसार ८०% कामे ही स्थानिक ठेकेदाराला संघटनेच्या माध्यमातून काम मिळून देणे . जिल्हा बाहेरील कंत्राटदारांना जिल्ह्यात कामे न मिळू देणे जिल्ह्यातील कंत्राटदारांना कामे प्राधान्याने मिळण्यास सबंधित अधिकारी यांना भेट घेऊन चर्चा करण्यासाठी लवकरच कार्यकारणी ची स्थापना करुन त्यामाध्यमातून विनंती करण्यात येईल. त्याकरिता वेळ पडल्यास आंदोलन करणे व कंत्राटदार यांच्या अडिअडचणी बाबत चर्चा झाली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश तायडे यांनी केले.