सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेच्या हद्दीत मरी माता मंदिर मागील क्रीडांगणसाठी आरक्षित जागेवर भुखंड माफीयांकडून खडे प्लॉटी टाकून ही जागा मनभावी पद्धतीने विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती समजली आहे.या अनुषंगाने पालिकेस तक्रारी प्राप्त झाल्या असता, सामान्य नागरिकांची फसवणूक होवू नये,म्हणून मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी जनहितार्थ अशा एन.ऐ.नसलेले भुखंड,गट,प्लाटीचे व्यव्हार कोणीही कोणा कडून करू नये,अशी जाहीर सुचना देखील एका दैनिकात प्रकाशित करून, तसेच अशा व्यवहारांची नोंदणी करू नये,याबाबत सावदा दुय्यम निबंधक कार्यालयास पत्र सुद्धा दिलेला आहे.[ads id="ads1"]
यानंतर सदर जागा क्रीडांगण साठी आरक्षित असल्याची माहिती समजली असता या आरक्षित जागेवर लवकरात लवकर दर्जेदार सार्वजनिक क्रीरडांगण उभारण्यात यावा.कारण की,पालिका स्थापनेपासून ते आजतागायत अशा आधुनिक काळात सुद्धा खेळडण्यासाठी शहरात एक सार्वजनिक मोठा मैदान तथा क्रीडांगण उपलब्धच नसून ही मोठी शोकांतिक बाब आहे.सबब या अनुषंगाने विचार करून सदर जागेवर सार्वजनिक क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात यावे.अशी मागणी शहरातील नागरिकांनी आज दी.४/८/२०२३ रोजी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.[ads id="ads2"]
यावेळी समाजीककार्यक्रते शेख इरफान, दिलीप चांदेलकर,युसूफ शाह,फरीद शेख,कलीम,शेख मुख्तार,शेख नाजीम,शेख कमरूद्दीन,अब्दुल गफार,इत्यादी नागरिक उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती राज्यचे क्रीडामंत्री,पालक मंत्री गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जळगाव व प्रांत अधिकारी फैजपूर यांना पाठविण्यात आले आहे.