भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचालित, श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणूविद्युत आणि दूरसंचार विभागात कार्यरत असलेले प्रा. गजानन उत्तम पाटील यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत अणूविद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग) विषयामध्ये पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, उपकुलसचिव (संशोधन) वि. व. तळेले, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.[ads id="ads1"]
प्रा. गजानन उत्तम पाटील यांनी "इव्हॅल्यूएशन अँड इंप्रुव्हमेंट ऑफ क्वॉलिटी ऑफ सर्व्हिस इन वायरलेस सेल्युलर नेटवर्क" या विषयावर शोधप्रबंध सादर केला व त्यांना भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचालित, श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणूविद्युत आणि दूरसंचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गिरीश अशोक कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]
प्रा. गजानन उत्तम पाटील यांच्या यशाचे कौतुक भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, इतर पदाधिकारी तसेच श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. डॉ. राहूल बी. बारजीभे, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकवर्ग करीत आहे.