जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये यावल तालुका विद्यार्थी विज्ञान मेळावा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुरेश पाटील)

आज मंगळवार दि.८ऑगस्ट  रोजी यावल येथील जे. टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न आला.[ads id="ads1"] 

      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ जी धनके हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे यावल तालुका अध्यक्ष जयंत चौधरी सर,सरस्वती विद्या मंदिर मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.[ads id="ads2"] 

      डॉ.नरेंद्र महाले सर तालुका विज्ञान अध्यक्ष तथा समन्वयक संदीप मांडवकर विषय तज्ञ व भूषण वाघुळदे ,सचिन भंगाळे सह समन्वयक म्हणून लाभले तसेच जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल शाळेतील प्राचार्या श्रीमती रंजना महाजन मॅम व डॉ.किरण खेट्टे सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस  धनके साहेब,प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

      डॉ.नरेंद्र महाले सर तालुका विज्ञान समन्वयक यावल

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना सर्व समाजापर्यंत भरड धान्याची आवश्यक ती माहिती पोहोचवण्यास मदत या उपक्रमांमधून होईल असे सांगितले.

        गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना व शिक्षक यांना विज्ञान मेळाव्याबद्दल सविस्तर माहिती दिली.या मेळाव्यात वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार 'भ्रम' याविषयी माहिती सांगितली तसेच त्यांची लेखी व तोंडी स्वरूपात परीक्षा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी सौ.किरण महाले,नितीन बारी, एच.ए.पाटील,के.जी. चौधरी ,  सुधीर पाटील यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून वैशाली इंगळे, सुनीता पाटील,दिपाली धांडे या शिक्षकांनी सहकार्य केले.

    त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅम यांनी केले . सौ.श्रद्धा बडगुजर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!