रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील निंभोरा सिम या गावात वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7 .ऑगस्ट रोजी सायंकाळी 6. वाजता मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये दिनांक 9 ऑगस्ट बुधवार रोजी 12. वाजता जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. [ads id="ads1"]
तरी या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून रावेर तालुक्यातील निंभोरा सिम मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक घेऊन गावातील सर्व एसटी, एससी, ओबीसी, लोकांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक कंदर सिंग बारेला, शहर उपाध्यक्ष दौलत अडांगळे ,तरुण सवरणे ,संदीप सवरने, मोहन सवरने सूर्यभान सवरने, धीरज सवरणे ,देवानंद रायमळे प्रकाश घेटे ,बेबाबाई सवरणे, कुसुम सवरने, रंभाबाई सवरने, माला बाई सवरने, शोभाबाई सवर्ण , लताबाई सवरने, गिताबाई सवरने, असे बहुसंख्य कार्यकर्ते व महिला पुरुष या बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन तरुण सवरने यांनी केले तर आभार संदीप सवरने यांनी मानले.



