आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त विद्यार्थ्यांना माहिती
यावल (सुरेश पाटील)
आज मंगळवार दि.८ रोजी यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली.[ads id="ads1"]
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.पौष्टीक तृण- धान्याबद्दल जागरूकता वाढविणे व तृणधान्य उत्पादन अधिकाधिक वाढविणे तसेच दैनंदिन आहारात पौष्टीक तृणधान्याचा वापर होण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ.सविता वारके मॅडम यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांनी विद्यार्थ्यांनी आई वडील यांच्याकडे आहारात तृणधान्य वापर करण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत महाजन सर तर आभार राजेंद्र फालक सर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



