रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 1/8/23रोजी रावेर येथील मे. बाजड यांचे कोर्टात रे.फौ. खटला क्र.83/16 मध्ये सरकार वि.कंचन नागो तायडे या खटल्यात मे.कोर्टाने आरोपीस विनयभंग प्रकरणी दोषी ठरवून आरोपीस 2 वर्ष सश्रम कारावास व 6000/₹ दंड तसेच दांडा तील 5000/₹ फिर्यादी हिस देण्याचे तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. [ads id="ads1"]
सदर कामी सरकारतर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील निलेश लोखंडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना याकामी पैरावी अधिकारी म्हणून सहा. फौजदार दुर्योधन सावळे यांनी सहकार्य केले.सदर कामी सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. आंदलवाडी येथील आरोपीने फिर्यादी च्या घरात रात्री प्रवेश करून फीर्यादी चा विनयभंग केल्याचे शाबीत झाल्याने मे. कोर्टाने आरोपीस शिक्षा सुनावली.यामधे फिर्यादी,साक्षीदार,तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.



