रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यापीठाच्या के सी आय आय एल (KCIIL) अंतर्गत महाविद्यालयाच्या नवो पक्रम आणि उद्योजकता विकास सेल (KIEDC) आयोजित ‘विश्व उद्यमीता दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. आर. एन. महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऐनपूर येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र युवराज पाटील तसेच जळगाव येथील अमोल पाटील हे उपस्थित होते. श्री. जितेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग उभारून परिसरात रोजगार दिला पाहिजे असे सांगितले. [ads id="ads2"]
तसेच श्री. अमोल पाटील यांनी उद्योगासंबंधी उपयुक्त शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री आर. एन. महाजन यांनी आजचा काळ हा तरुणांचा व तंत्रज्ञानाचा आहे, आजच्या युवकांनी उपलब्ध असलेल्या उद्योजकता विषयी शासकीय योजना व संधी जाणून उद्योजकता ही करिअर निवड केली पाहिजे असे त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवोपक्रम व उद्योजक मंडळाचे चे प्रमुख डॉ. डी. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. एस. ए. पाटील यांनी रोजगारयुक्त भारत या संकल्प पत्राचे वाचन सर्व विद्यार्थ्यांकडून केले. शेवटी मान्यवरांचे आभार नवोपक्रम व उद्योजक मंडळाचे चे समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.