रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत व्यक्तिमत्व विकास व नशा मुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी गुटखा, तंबाखू, सिगारेट व कोणतेही नशेली पदार्थाचे सेवन करू नये तसेच महाविद्यालय व्यसनमुक्त परिसर व्हावा असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय मनोज श्रीराम महाजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना व्यसनाविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र मुळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. प्रदीप तायडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ.विनोद रामटेके,प्रा.एस.पी. उमरीवाड,प्रा.नरेंद्र मुळे,प्रा.प्रदीप तायडे,प्रा.अक्षय महाजन ,डॉ आर. व्ही.भोळे.प्रा.ज्ञानेश्वर कोळी,श्रेयस पाटील,हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा डॉ. व्ही.एन.रामटेके विद्यार्थी विकास अधिकारी यांनी मान्यवरांचे आभार मानले. व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.