यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.चा. येथे जन्मदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप!....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.चा. येथे जन्मदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप!....

मा.प.स.सदस्य जगन्नाथ धोंडू महाजन यांचा समाजोपयोगी उपक्रम !....

चाळीसगांव प्रतिनिधी - प्रा.पंकज पाटील

चाळीसगांव -  टाकळी प्र.चा गावाचे माजी सरपंच तसेच माजी पंचायत समिती सदस्य चाळीसगाव आप्पासो जगन्नाथ धोंडू महाजन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.चा. येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू पेन, पेन्सिल, पट्टी, खोड रबर, शॉपनर, पुस्तक ई. शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.[ads id="ads1"] 

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्रीमती.पी.आर.राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती. एस.जे.राजवाल होते. शाळेच्या वतीने टाकळी प्र.चा.गावाचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ धोंडू महाजन यांच्या जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ शाल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर अभिष्टचिंतनाच्या प्रसंगी जगन्नाथ धोंडू महाजन यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक मदतीचा हात दिला.[ads id="ads2"] 

   शाळेतील मुलांना या साहित्याचा निश्चितच उपयोग होईल, त्यांचे हे समाजोपयोगी कार्य त्यांना बलदंड आयुष्य देईल हीच निर्मिका चरणी प्रार्थना असे प्रतिपादन शाळेतील उपशिक्षिका हेमांगी महाजन यांनी केले.

         याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक आर.के. सोनवणे, प्रा.पंकज पाटील, रवी शंकट, उमेश शंकट तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!