यावल तालुका प्रतिनिधी :-मिलिंद जंजाळे
भारतीय डाक विभागातर्फे, विभाग भुसावळ मधील यावल उपविभागात आज दि. ०१/०८/२०२३ रोजी सातपुडा पर्वत रांगांमधील अतिदुर्गम भागात वसलेल्या मोहमांडली या गावात मा. अधीक्षक डाकघर भुसावळ विभाग भुसावळ श्री. कुंदन जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. निरीक्षक डाकघर यावल उपविभाग यावल ४२५३०१ श्री भूषण सैंदाणे साहेब यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली अंधारमळी या नवीन शाखा डाकघराचे उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
सदर प्रसंगी गावच्या सरपंच श्रीमती रजियाबाई मुस्तफा तडवी, उपसरपंच श्री कुरबान रमजान तडवी, ग्रामसेवक श्री महेश पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री जहांगीर शहादुर तडवी, श्रीमती गुलशन कलिंदर तडवी, श्रीमती हसीना शब्बीर तडवी व समस्त गावकरी उपस्थित होते. सदर प्रसंगी मा. अधीक्षक डाकघर श्री कुंदन जाधव साहेब यांनी पोस्ट खात्याच्या अनेकविध योजना विषयी मार्गदर्शन केले व जगातील सर्वात विश्वसनीय अशा भारतीय डाक विभागाच्या डाकघरात आपली गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. [ads id="ads2"]
सदर प्रसंगी उपसरपंच श्री कुरबान रमजान तडवी यांनी अतिदुर्गम भागात सुद्धा कशा पद्धतीने भारतीय डाक विभाग सेवा देण्यात तत्पर व समर्थ आहे याविषयी बोलून शाखा डाक घराच्या कार्याविषयी गावकऱ्यांना माहिती दिली. सदर कार्यक्रमाप्रसंगी यावल डाक सर्वेक्षक श्री निखिल रवींद्र
पारीस्कर, भुसावळ विभागीय पदाधिकारी श्री हेमंत कुरकुरे, श्री किरण चौधरी, कर्मचारी श्री दुर्गेश धांडे श्री इस्तेक्याउद्दिन सैय्यद, श्री रफिक तडवी व श्री लोकेश बडगुजर यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी मेहनत घेतली.




