प्रहार दिव्यांग संघटना तर्फे पाल येथील ग्रामसेवक यांना 5% टक्के निधी मिळावा आणि 50 टक्के घरपट्टी सूट मिळावी यासाठी निवेदन सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 प्रहार दिव्यांग संघटना तर्फे पाल येथील ग्रामसेवक यांना 5%  टक्के निधी मिळावा आणि 50 टक्के घरपट्टी सूट मिळावी यासाठी निवेदन सादर


  रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)

प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी मंत्री माननीय बच्चुभाऊ, यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी, यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश दादा पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रहार दिव्यांग सेवक विनोद कोळी, प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रहार जनशक्ती अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वाशिम शेख, प्रहार दिव्यांग सहसचिव संतोष कोळी, प्रहार सेवक सुधीर पाटील, यांच्या उपस्थितीत आज दिनांक एक ऑगस्ट 2023 या रोजी रावेर तालुक्यातील पाल या गावी ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

   पाल या गावातील ग्रामपंचायत मध्ये शासन जीआर 2016 नुसार 2016 ते 2023 या कालावधीत आजपर्यंत दिव्यांग बांधव यांना लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने पाल येथील ग्रामसेवकाने सर्व दिव्यांग बांधवांना 5%  टक्के निधी ग्रामनिधीतून त्वरित देण्यात यावा तसेच कर्वसुलीमध्ये पन्नास टक्के सवलत सूट मिळावी असे निवेदन पत्रात नमूद करण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

तसेच विना अट दिव्यांग बांधव यांना घरकुल यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यात यावे इत्यादी मागण्या ग्रामसेवक यांनी 30 ऑगस्टपर्यंत त्वरित देण्यात याव्यात दिव्यांग बांधवांच्या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास पाल येथील ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रहार सेवक विनोद कोळी, तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच एक महिन्याच्या आत सर्वांना पाच टक्के निधी देण्याचे आश्वासन ग्रामसेवक यांनी केले.

    त्या ठिकाणी उपस्थित प्रहार कार्यकर्ते सलीम भाऊ तडवी, शेख सादिक भाऊ, दिलीप भाऊ राठोड, भुरा भाऊ तडवी. तसेच दिव्यांग बांधव ग्रामपंचायत मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!