नगरपालिका कार्यक्षेत्रात जुन्या जाणत्या ठेकेदारांच्या नावाखाली होतकरू कॉन्ट्रॅक्टर यांना सुगीचे दिवस

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


कामा ठिकाणी इंजिनियर थांबत नसल्याने कामाची गुणवत्ता गेली खड्ड्यात

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीत रस्ते बांधकामाचा धुमधडाका सुरू आहे या रस्ते बांधकामात जुने जाणते ठेकेदारांच्या नावावर कार्यारंभ आदेश मिळवून काही तरुण तडफदार होतकरू कॉन्ट्रॅक्टर रस्ते बांधकामात उतरले आहेत हे तरुण तडफदार होतकरू कॉन्ट्रॅक्टर कोणत्या पक्षाचे आणि कोणाचे समर्थक आहेत हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे रस्त्याचे बांधकाम करताना मात्र त्यांना रस्ते बांधकामाचा पूर्ण पूर्ण आणि पाहिजे त्या प्रमाणात अनुभव नसल्याने आणि बांधकामाचे साहित्य त्यांच्या जवळ नसल्याने झालेल्या रस्त्याची गुणवत्ता मात्र खड्ड्यात गेली असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

   कोणते काम कोणाच्या निधीतून कोणत्या विभागामार्फत किती रकमेचे याबाबतचा फलक कामाच्या ठिकाणी लावला जात तसेच विरोधक काही समाजसेवक आणि काही संघटना संबंध चांगले ठेवण्याच्या नावाखाली आणि निवडणुकीत मतदानाचा फायदा कसा होईल याकडे लक्ष ठेवून हे सुद्धा गप्प असल्याने शासनाच्या निधीची उधळपट्टी होत असल्याचे संपूर्ण यावलकर उघड्या डोळ्यांनी बघत आहे.यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी व कार्यवाही करून आपल्या वरिष्ठांकडे तसे अहवाल पाठवायला पाहिजे असे सुद्धा बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!