यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यातील अंजाळे परिसरात व अंजाळे घाटा जवळ,तापी नदी परिसरात, हतनूर पाटाच्या आजूबाजूस असलेल्या लाखोच्या संख्येने असलेले बाभूळ वृक्षाचे घनदाट जंगल आहे.बाहेरील जिल्ह्यातील व आपल्या भुसावळ परिसरातील काही वृक्षतोड उद्योजक या बाभूळ वृक्षाची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कोळसा भट्टी लावून कोळसा विक्री व इतर कारणासाठी बाभूळ वृक्ष लाकूड विक्री करण्याची तस्करी बिन बोभाटपणे सर्रास तस्करी सुरू आहे.[ads id="ads1"]
या बाभूळ वृक्षतोड प्रकरणाकडे संबंधित सर्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण भुसावल परिसरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.बाभूळ वृक्ष कोणीही यावे आणि कोणीपण तोडून काहीही उद्योग करावे याबाबत कोणाचे नियंत्रण आहे किंवा नाही..? बाभूळ वृक्ष तोड ग्रामपंचायत क्षेत्रात,वन विभाग क्षेत्रात किंवा पाटबंधारे विभाग क्षेत्रात येते किंवा कसे आणि बाभूळ वृक्ष तोडला कोण परवानगी देत असते.[ads id="ads2"]
कोणाचे नियंत्रण आहे..? कोण कारवाई करू शकतो..? आणि बाभूळ वृक्ष तोडणाऱ्यांकडून मोठ मोठ्या रकमा कोण वसूल करीत आहे याची सुद्धा चौकशी भुसावळ व यावल येथील प्रांताधिकारी तहसीलदार यांनी करावी तसेच याबाबतचा खुलासा संबंधित विभागाने जनतेच्या माहितीसाठी किंवा त्या परिसरात दोन-तीन ठिकाणी फलक लावून जाहीर करावे असे सर्वत्र बोलले जात आहे.