साक्रीत जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त व मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मुक मोर्चा चे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 साक्री (अकिल शहा ): धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो परंतू मणिपूर येथे आदिवासी बघिणींवरती मानवता विरोधी कृत्यामुळे आज दिनांक ०९/०८/२०२३ रोजी कुठलेही वाद्य न लावता तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने निषेध मुक मोर्चा काढण्यात आला, साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पासून मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ शांततेत मिरवणूक काढण्यात आली होती, [ads id="ads1"] 

  मिरवणुकी दरम्यान कुठलेही अनुचित प्रकार, घटना घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक श्री. मोतीराम निकम साहेब यांच्या वतीने सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा देवून मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले होते व  मिरवणुकी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार यासाठी साक्री पोलिसांकडून उपाय योजना करण्यात आल्या होत्या.[ads id="ads2"] 

   साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून रॅली ची सुरूवात झाली पुढे गोल्डी पॉइंट मार्गे बस स्टॅण्ड रोड, बाजार पेठ आणि शेवटी बाल आनंद नगरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करीत समारोप करण्यात आला , कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य आदिवासी भिल्ल संघटना महाराष्ट्र प्रदेश एकलव्य कमांडो युवाशक्ती चे पदाधिकारी धर्मेंद्र बोरसे , मच्छिंद्र गायकवाड, विजय ठाकरे , हेमंत पवार , देविदास सोनवणे,चंदू मालचे , दादा बागुल आदि यांनी केले होते या वेळी मोठया संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!