यावल तालुका (प्रतिनिधी )मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी या गावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच यांच्या संकल्पनेतून संपुर्ण ' माझी माती, माझा देश ' हे अभियान वीर व वीरांगनां यांच्या स्मरणार्थ राबविले जात आहे. शहीदांचे स्मरण केले जात आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार साकळी ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.९ ऑगस्ट क्रांतिदिनी रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले.[ads id="ads1"]
त्यात सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयात गावातील नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहभागाने हातात मातीची पणती घेऊन पंचप्राण शपथ घेण्यात आली.व शहीद शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर जि.प.मराठी मुला- मुलींच्या शाळेत शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारा शिलालेख लावण्यात आला व या फलकाला उपस्थितांनी वंदन केले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी,सर्फराज तडवी,सै. अशपाक सै. शौकत,सामाजिक कार्यकर्ते मनू निळे,आकाश पाटील,नूतन विकासोचे चेअरमन मोहन बडगुजर,सचिव प्रमोद लोधी,ग्रामसेवक हेमंत जोशी,साकळीचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी,मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर,सर्व शिक्षक तसेच ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,ग्रामपंचायत कर्मचारी लीलाधर मोरे,चिंतामण सुरवाडे,जीवन कंडारे,पिंटू पवार,भागवत बिराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या अभियानात गावात वृक्षारोपण केले जाणार आहे.उपस्थितांना ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे यांनी पंचप्राण शपथ दिली.या कार्यक्रमाप्रसंगी देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेले होते.