यावल तालुका (प्रतिनिधी )मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाड येथे दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राजाराम मोरे सर यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. [ads id="ads1"]
तदनंतर शाळेतील शिक्षक श्री. शेख सर यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले. श्री. दीपक चव्हाण सरांनी आदिवासी जनसमुदाय व त्यांचे जंगल संवर्धन यातील महत्व सांगितले. श्री. सागर चौखंडे सरांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध जनजामाती यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.[ads id="ads2"]
त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता निमित्त "मेरी माटी मेरा देश" या केंद्रशासन पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी तथा शिक्षक यांनी 'पंचप्रण शपथ' घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन श्री. संदीप बारी सरांनी केले.