वैद्यकीय व्यावसायिकांनी यावल तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
यावल ( सुरेश पाटील ) कोणतीही अधिकृत पदवी नसताना यावल तालुक्यात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी आज यावल तहसीलदार व यावल गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले.[ads id="ads1"]
यावल तहसीलदार सौ. मोहन मला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनात यावल तालुक्यातील संपूर्ण वैद्यकीय व्यवसायिकांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे की आपल्या कार्यालयात मागील वर्षी दि. 21 जून 2022 रोजी तालुक्यात बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही कार्यवाही करण्यात आली असती तर कोरपावली येथील दुखद घटना घडली नसती विशेष म्हणजे अद्याप गेल्या दोन दिवसात सदर कोरपावली येथील घटनेचा गुन्हा नोंद झालेला नाही. तरी आपल्या कार्यालया अंतर्गत गुन्हा नोंद व्हावी व इतर बनावट डॉक्टर यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
निवेदन देतेवेळी यावल व तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.कुंदन फेगडे, डॉ.रमेश पाचपोळे,डॉ.अभय रावते,डॉ.गणेश रावते,डॉ.बी. के.बारी,डॉ.धिरज चौधरी,डॉ. तुषार चौधरी,डॉ.इशारार खान, डॉ.सतीश आसवार डॉ.धिरज पाटील,डॉ.सर्फरज तडवी डॉ. अमित तडवी,डॉ.गौरव धांडे, डॉ.तुषार सोनावणे,डॉ.अमोल महाजन,डॉ.युवराज चोपडे,डॉ. दीपक चौधरी,डॉ.दाऊद खान, डॉ.मनोहर महाजन,डॉ.हरिष महाजन, डॉ.चंद्रकांत चौधरी इ उपस्थित उपस्थित होते व त्यांनी आपली स्वाक्षरी केली आहे.
माहितीस्तव निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव,जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव,तालुका वैद्यकीय अधिकारी यावल, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यावल,प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी,तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दिल्या आहेत.


