वाळू तस्कराकडून महिला मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून ढकलून वाळू ट्रॅक्टर सह पलायन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


संपूर्ण महसूल यंत्रणेत तीव्र संताप

यावल पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वाळू तस्करांना नेमके अभय कोणाचे..?

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी तथा सर्कल यांची आज साकळी, शिरसाड परिसरात वाळू साठा देखरेख साठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती,त्या ठिकाणी जात असताना रस्त्यात एक वाळू तस्कर ट्रॅक्टर  सह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळून आल्याने त्याला थांबून विचारपूस करीत असताना वाळू वाहतुकीचा  परवाना आहे किंवा नाही याबाबतची माहिती घेत असताना वाळू तस्कराने मंडळ अधिकारी तथा सर्कल सौ. बबीता चौधरी यांना दमदाटी व शिवीगाळ करून ढकलून वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली सह पलायन केले.साकळी मंडळात वाळू तस्कराकडून मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना घडल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी शासकीय काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,त्या वाळू तस्कराविरुद्ध सर्कल सौ.बबीता चौधरी यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]  

 यावल तालुक्यात सर्वात जास्त साकळी मंडळात आणि बामनोद मंडळात तापी नदी किनारपट्टीवरून अवैध गौण खनिज उत्खनन करून गौण खनिज व अवैध वाळू वाहतूक  मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या वाळू तस्करांना अभय कोणाकोणाचे आहे..? याबाबत सुद्धा आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"]  

       गेल्या महिन्यातच साकळी परिसरात एका ठिकाणी हजारो ब्रास वाळू साठा आढळून आला असता त्यापैकी फक्त 50 टक्के वाळू साठा असल्याचा पंचनामा करण्यात येऊन त्याची विल्हेवाट सुद्धा यावल महसुलने कायदेशीर रित्या आणि त्यांच्या सोयीनुसार लावली असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे या वाळू तस्करांना महसूल मधीलच काही ठराविक हितसंबंध असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि काही लोकप्रतिनिधींचे अभय असल्याने वाळू तस्करांची हिम्मत,दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.वाळू तस्करावर कारवाई करताना मात्र शासन काही ठराविक प्रसिद्धी माध्यमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वृत्त प्रसिद्ध झाल्याचे निमित्त दाखवून कारवाई करीत असल्याचे वाळू तस्करांना सांगत असल्याने वाळू तस्कर हे प्रसिद्धी माध्यमांना दमदाटी,मारहाण, शिवीगाळ करण्याइतपत दादागिरी करीत असल्याने तालुक्यातील अवैध गोंण खनिज उत्खनन करणाऱ्या व अवैध गव्हाण खनिज वाहतूक करणाऱ्यांच्या नाव आणि वाहनांसह चौकशी करून यादी करून प्रांताधिकारी,यावल तहसीलदार,यावल पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी असे बोलले जात आहे.

तूर्त मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना ढकलून देणारा आरोपी व दुसरा एक जण ट्रॅक्टरसह फरार झाला आहे.

           मंडळ अधिकारी सौ. बबीता चौधरी यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे की,

आज गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी माझी पर्यवेक्षक म्हणुन थोरगव्हाण,ता.यावल येथे ड्युटी नेमण्यात आली.

असल्याने मी यावल येथुन खाजगी वाहनाने थोरगव्हाण, ता.यावल येथे जात असतांना 12.13 वा.चे सुमारास वढोदा प्र.ता.यावल गावाजवळील शिरसाड गावाकडे जाणा-या शिरसाड शिवारातील रोडने जात असतांना माझ्या समोरुन एक निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली येत असतांना मला दिसले म्हणुन मी सदरचे ट्रॅक्टर थांबविले व सदर ट्रॅक्टरची ट्रॉलीची तपासणी केली असता त्यात सुमारे 01 ब्रास वाळु सुमारे 4457/- रुपये किंमतीची भरलेली दिसली म्हणुन मी सदर ट्रॅक्टरवरील चालकास त्याच्या कडे वाळु वाहतुकीचा परवाना आहे अगर कसे तसेच सदरचे ट्रॅक्टर हे कोणाचे मालकीचे आहे बाबत विचारणा केली असता त्याने त्याचेकडेस परवाना नसलेबाबत सांगितले म्हणुन मी त्यांस ट्रॅक्टरचे खाली उतरण्यास सांगितले त्यामुळे तो खाली उतरला व मी ट्रॅक्टर वर चालकाचे सीटवर बसले. त्यानंतर सदर ट्रॅक्टरवरील चालकाने कोणाला तरी फोन लावला थोड्याच वेळात त्याठिकाणी 2 अनोळखी इसम आले.तेव्हा त्याठिकाणी आलेल्या एका इसमाने माझ्याशी हुज्जत घातली व तुम्ही ट्रॅक्टर खाली उतरुन आमचे ट्रॅक्टर सोडा असे म्हटला,त्यांस मी तुमचे ट्रॅक्टर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही असे म्हटले असता त्या ईसमाने माझा उजवा हात ओढुन मला ट्रॅक्टरखाली ओढुन उतरविण्याचा प्रयत्न केला. त्याने मला ओढल्यामुळे मी ट्रॅक्टर वरुन खाली पडले त्यात माझ्या उजव्या हाताचे कॉपरवर व मनगटावर रोडाचा रस्त्याचा मार लागुन दुखापत झाली आहे.त्यावेळी मी स्वत कसे तरी उठले.त्यावेळी त्याने मला ट्रॅक्चर वरुन ओढल्यानंतर तो अनोळखी इसमाने ट्रॅक्टर सुरु करुन मला शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यातील असलेल्या वाळुसह ट्रॅक्टर जागेवरुन पळवुन नेले.त्यावेळी माझे सोबत असलेले माझ्या खाजगी वाहनावरील चालक विशाल सपकाळे अशांसोबत यावल पोलीस स्टेशनला आलो त्याठिकाणी यावलचे तलाठी ईश्वर रामलाल कोळी यांना बोलवुन घेतले व सदर घटनेची माझे वाहन चालक विशाल सपकाळे यांनी त्यांचे मोबाईल मध्ये तयार केलेली व्हीडीओ शुटींग त्यांना दाखविली,माझा हात ओढून मला ट्रॅक्टर खाली ओढून माझ्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद दिल्याच्या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला बारावी कलम 353,354,379, 332,504,506,34 प्रमाणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 47 (  7 ) व  48 (  8 ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास यावल पोलीस करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!