यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल पंचायत समितीत सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले सरवर सरदार तडवी हे आपल्या प्रदीर्घ उत्कृष्ठ व यशस्वी प्रशासकीय सेवेतुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत होत असुन, सरवर तडवी यांनी प्रशासकीय सेवेत कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणुन त्यांनी ओळख निर्माण केली.[ads id="ads1"]
पंचायत समितीच्या सभागृहात विविध प्रशासकीय व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातीत मान्यवरांच्या उपस्थितीत तडवी यांच्या विषाई मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावल पंचायत समिती मध्ये सहाय्यक प्रशासक अधिकारी म्हणुन सेवा बजावणारे सरवर सरदार तडवी हे मुळ साकळी तालुका यावल तालुक्यातील असुन, आपले शिक्षण पुर्ण केल्यावर सर्वप्रथम दिनांक १ / १२ / १९८९ जिल्हा परिषदच्या सिंचन विभाग रूजु झालेत , त्यानंतर दिनांक ८ / ६ / ९० यावल पंचायत समिती त्यांनी सेवा बजावली , दिनांक ५ / ६ / १९९३मध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागा, दिनांक १ / ४ / १९९८या कालावधीत जिल्हा परिषदच्या कृषी विभागात त्यांनी सेवा कार्य केले, यावल पंचायत समिती मध्ये दिनांक ९ / ९ / २००३ रोजी पदोन्नती होवुन कार्यालय अधिक्षक या पदावर रूजु झालेत.[ads id="ads2"]
दिनांक २० / ६ / २००७या कालावधीत पुश्नच त्यांना पदोन्नती मिळाल्याने ते जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभाग जळगाव येथे कक्ष अधिकारी व दिनांक२२ / ७ / २०१३ जिल्हा परिषद सामाऱ्य प्रशासन विभाग व पुनश्च जळगाव येथे दिनांक १५ / २ / २०१६ पुढील तिन वर्ष महिला व बालकल्याण विभागात सेवा दिली , नंतर दिनांक१ / ८ / २०२१ते २०२३पर्यंत यावल येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावर ते आज आपल्या ३३ वर्ष सात महिने प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमा दरम्यान गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड, विस्तार अधिकारी के सी सपकाळे, हबीब तडवी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजू तडवी, जावेद तडवी महीला कर्मचारी यांसह संपुर्ण प्रशासक वर्ग व ग्रवसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,


