तसेच जागतिक आदिवासी दिना बद्दल बोलताना एकमेकांमध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असला पाहिजे असे त्यांच्या समारोपीय भाषणामध्ये सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागातील प्रा. प्रदीप तायडे यांनी क्रांती दिनानिमित्ताने 1920 पासून ते 1942 पर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात केली आणि इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी सतत झटत राहिले असे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले तसेच या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते मराठी विभागातील प्रा. डॉ. एम. के. सोनवणे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने या देशातील आदिवासी हे या देशातील मूलनिवासी आहेत त्यांची संस्कृती त्यांची राहणीमान ही या देशातील आहे आणि ते भारत देशातील रहिवासी आहेत असे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. [ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विनोद एन. रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला 92 विद्यार्थी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. व्ही.एन. रामटेके, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे,प्रा.डॉ. डी. बी. पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा.डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. डॉ. रेखा पी. पाटील, प्रा. डॉ. पी. आर.गवळी प्रा. डॉ. एस. एन. झोपे यांनी काम पाहिले.शेवटी मान्यवरांचे आभार प्राध्यापक नरेंद्र मुळे यांनी मानले. व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.