रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल मध्ये थ्रीडी ॲनिमेशन द्वारे प्रत्यक्ष तारांगण अनुभवण्याची संधी विद्यार्थिनींना मिळाली सदर कार्यक्रम भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल (पोलाद स्टील जालना) व दिशा ट्रेडर्स (रावेर) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन डॉ.दत्तप्रसाद दलाल यांनी केली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे.एस.कुलकर्णी (पुराणिक) मॅडम व स.जी.जी.हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री.एस.आर. महाजन सर हे होते. थ्रीडी तारांगणातून विद्यार्थिनींना प्रत्यक्ष तारांगणातील ग्रह तारे तसेच खगोलशास्त्राविषयी सखोल माहिती मिळाली.[ads id="ads2"]
प्रत्यक्ष अनुभवांद्वारे माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनीनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री सुनील महाजन सर श्री.आर. के. शिंदे सर यांनी परिश्रम घेतले तसेच श्री. एम.जे.पाटील सर, श्री.अजय महाजन सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.