ऐनपूर: सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी कु.रितेश गोपाळ तायडे.रा पुरी गोलवाडे याची नुकतीच सीआरपीएफ मध्ये निवड झाली. या यशाबद्दल त्याचे ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.भागवत विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष श्री रामदास नारायण महाजन, चेअरमन श्री.श्रीराम नारायण पाटील , सचिव श्री.संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऐनपूर महाविद्यालयातील इतिहास विभागाचा विद्यार्थी कु.रितेश तायडे याची सीआरपीएफ मध्ये निवड
सोमवार, ऑगस्ट २८, २०२३