माजी जळगाव जि.प.सदस्य वंसतराव महाजन यांचे निधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील साकळी  येथील रहिवासी असलेले शारदा विद्या मंदिर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य व भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रतोद  वसंतराव रामजी महाजन वय ७२ यांचे आज दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. [ads id="ads1"] 

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साकळी दहिगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा साकळीच्या माजी प्रथम महिला सरपंच विद्याताई महाजन यांचे पती तर प्रगतिशील शेतकरी भास्करराव महाजन ,रमेशराव महाजन यांचे भाऊ व  जितेंद्र महाजन, राज्याच्या शिक्षण विभागाचे अव्वर सचिव तुषार महाजन व साकळी नूतन विकास सोसायटीचे संचालक श्याम महाजन यांचे वडील होत. [ads id="ads2"] 

  व स्व.वसंतराव महाजन हे साकळी दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद होते. तसेच त्यांनी साकळी ग्रामपंचायतीची सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच राजकीय व सार्वजनिक जीवनात काम करतांना राज्यभरात मोठा जनसंपर्क होता. तसेच गावातील विविध पदे सांभाळताना गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!