स्वातंत्र्य दिनी ही यावल पंचायत समिती सोमोर माजी पंचायत समिती गट नेते शेखर पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

स्वातंत्र्य दिनी ही यावल पंचायत समिती सोमोर माजी पंचायत समिती गट नेते शेखर पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच

यावल तालुका प्रतिनिधी :-  मिलिंद जंजाळे संपूर्ण देशात 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन जल्लोषात साजरा करण्यात असुन तालुक्यातील सावखेडा सिम येथे 2020 पासुन आज पर्यंत ग्रामपंचायत सावखेडा सिम येथिल सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, यांनी ग्रामपंचातीला येणारा निधी चा अपहार केला असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आमरण उपोषण कर्ते माजी पंचायत समिती गट नेता शेखर पाटील यांनी केली आहे.[ads id="ads1"] 

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे सन 2020 पासुन आज पावेतो झालेला अपहार पाहता या बाबत लेखी तक्रार तोंडी सूचना देऊन ही गटविकास अधिकारी यांनी आज पावेतो सावखेडा सिम येथिल ग्रामपंचायत मध्ये अपहार करण्याऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही गटविकास अधिकारी यांनी केलेली नाही. त्यामुळे दिनांक 14/08/2023 पासुन माजीपंचायत समिती गट नेते शेखर पाटील यांनी आमरण उपोषण निर्धार केला असुन जो वर अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल होत नाही . जो पर्यंत अपहार करण्याऱ्यावर कार्यवाही व गुन्हे दाखल केले जाणार नाही तोवर उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी मागणी उपोषण कर्ते माजी पंचायत समिती गटनेता शेखर पाटील यांनी केली असुन आमरण उपोषण कर्ते यांनी जोपर्यंत दोषीन वर कार्यवाही होत नाही तो पर्यंत उपोषण मागे नाही अशी ठाम पणे भूमिका घेतली असुन आज स्वातंत्र्य दिनी ही त्यांचे आमरण उपोषण सावखेडा सिम येथिल ग्रामस्थ यांना सोबत सुरु आहे. [ads id="ads2"] 

  आज आमरण उपोषणाचा माजी पंचायत समिती गट नेते यांचा दुसरा दिवस आहे. भारत स्वतंत्र झाला असतांना सुद्धा नागरिकांच्या हक्कासाठी स्वतंत्र दिनी ही आमरण उपोषण सुरु ठेवावे लागत आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी अधिकारी वर्गाच्या हालचाली सुरु केल्या लवकर दोषी वर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपोषण कर्ते यांच्या कडून समजले असता जोपर्यंत दोषीवर कार्यवाही होणार नाही तोवर उपोषण मागे घेतले जाणार नाही एकच अट घेऊन माजी पंचायत समिती गट नेते शेखर पाटील यांनी ठेवली आहे असुन यावेळी रावेर यावल तालुक्याचे आमदार यांच्या सह जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल तालुका शहर काँग्रेस चे अध्यक्ष कदीर खान, काँग्रेस अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे, चोपडा विधानसभा सभा मतदार संघांचे डॉ चंद्रकांत बारेला, युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष पवन पाटील, माजी तालुका अध्यक्ष एड देवकांत पाटील, व अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी,सावखेडा सिम येथिल ग्रामस्थ यांच्या सह आमरण उपोषणास पाठिंबा दिला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!