यावल येथील सरस्वती विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

आज शनिवार दि.12 ऑगस्ट 2023 रोजी यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे करण्यात आले.

      विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्याध्यापक  जी.डी.कुलकर्णी सर हे होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी निवृत्त शिक्षक पी.एस.सोनवणे सर,प्रा.एस.एम.जोशी प्रमुख पाहुणे म्हणून होते.[ads id="ads1"] 

  विज्ञान प्रदर्शनामध्ये 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी मुख्य विषय  समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान व उपविषय आरोग्य , पर्यावरणासाठी जीवनशैली, शेती,दळणवळण आणि वाहतूक,संगणकीय विचार असे होते.कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक ए.डी.चव्हाण सर.ए. एस.सूर्यवंशी,एच.डी.चौधरी, एम.एम.गाजरे,बी.पी.वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"] 

         कार्यक्रमासाठी यावल तालुका विज्ञान समन्वयक व उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दिपक पाटील,एन.डी.भारुडे, एस.बी.चंदनकार बापू ठाकूर,

दिपक जोशी,किरण ओतारी, मनिष तांबोळी,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.लहान गट प्रथम हर्षल बुरुजवाले,मोठा गट प्रथम विवेक पाटील.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!