रावेर (विनोद हरी कोळी) : स. व. प. कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे समाजात एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी रेड रिबन क्लब ची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालय पाल येथील आय. सी. टी. सी. सल्लागार श्री. विश्वास पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. [ads id="ads1"]
त्यांनी विद्यार्थ्यांना गरोदर माता, गुप्तरोग, एड्स, ए. आर. टी. औषधोपचार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एच. आय. व्ही. प्रसार व प्रतिबंध याविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी तर डॉ. रेखा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


