दिनांक 1 ऑगस्ट 2023 मंगळवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन हे होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस जे पवार, बी इ महाजन, वरिष्ठ लिपिक एस पी निळे भाऊसाहेब, एन पी पाटील , सदाशिव निळे श्रीमती कीर्ती देसले हे उपस्थित होते. [ads id="ads1"]
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले [ads id="ads2"]
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन यांनी लोकमान्य टिळकांविषयी लेखक,संपादक, देशाचे स्वातंत्र्य, तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी फकीरा, गुणवत्ता, मुंबई चळवतील योगदान याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कीर्ती देसले यांनी केले तर आभार एन पी पाटील सर यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.