रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथील सौ कमलाबाई अगरवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय रावेर येथे नुकताच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळीकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अशोकशेठ वाणी होते.[ads id="ads1"]
सुरुवातीला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले.कार्यक्रमात गीतमंच मधील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
शालेय जीवनात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून आर्थिक परिस्थिती अभावी वंचित राहावे लागते त्यांची गरज लक्षात घेऊन कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये दरवर्षी गरजू विद्यार्थिनींना मोफत गणेश वाटप केले जातात याकरीता रावेर शहरातील उदार दात्यांकडून मिळालेल्या रकमेतून गणवेश व शालेय साहित्याची मदत करण्यात येते.[ads id="ads2"]
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाश मुजुमदार, चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल संचालक शैलेंद्रकुमार देशमुख, विजय लोहार, प्रभाकर महाजन, सरदार जी जी मुख्याध्यापक शिरीष वाणी तर देणगीदार भास्कर महाजन, अरुण कैलास शिंदे, दिलीप वैद्य, प्रा. शैलेश राणे,पी व्ही पाटील, भारती मनवाणी,आनंद भोकरीकर, रिजवान पटेल, मोतीराम भावनदास खटवाणी, राजेश अग्रवाल,मनोज रतनानी तसेच मुख्याध्यापिका जे. एस. कुलकर्णी, पर्यवेक्षक रमण तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल राठोड तर आभार जी वाय चौधरी यांनी मानले.समिती प्रमुख यु आर भारुडे, सदस्य पी व्ही केदारे एस एन महाजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.