चौकशी कारवाई कागदोपत्री..!
यावल (सुरेश पाटील) पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना राबविताना विद्यार्थ्यांपेक्षा संबंधित इतर यंत्रणेचे पोषण जास्त होत असल्याचे तसेच शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत धान्यादी माल, प्रमाणाचा तक्ता व पाककृती मिळाल्यानंतर मालाचे प्रमाण पाककृती प्रमाणानुसारच दिले जात आहे किंवा नाही..? याची प्रत्यक्ष खात्री पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक हे करीत नसून फक्त कागदोपत्री करीत असल्याने,या योजनेत विद्यार्थ्यांपेक्षा इतरांचेच जास्त पोषण होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालक वर्गात बोलले जात असून गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या सर्व यंत्रणेमार्फत तालुक्यातील शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो त्यावेळेस अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यास विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचे प्रमाण,विद्यार्थ्यांची संख्या,शाळेत शिल्लक धान्याचा साठा शाळांमार्फत दररोज पोषण आहाराचा दिला जाणारा ऑनलाईन रिपोर्ट यामध्ये मोठा घोळ झाल्याचे निदर्शनात येईल.[ads id="ads1"]
८ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक यांना दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, सन २०२३-२४ या कालावधीसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग प्राथमिक पात्र शाळांमधील इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर शिजवलेला गरम ताजा आहार देण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत तसेच जळगाव जिल्ह्यासाठी नियुक्त पुरवठेदार यांचे कडून तांदूळ वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करून घेण्याबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने पुरवठेदार यांचे कडे शाळा विद्यार्थी संख्यानिहाय तांदूळ व धान्यादी मालाची मागणी नोंदविण्यासाठी साप्ताहिक पाककृती तयार करून धान्यादी माल साहित्याचे प्रमाण गटस्थारावर व शाळा स्तरावर देणे आवश्यक असल्याने सोबत पाककृती जोडण्यात आली असून त्यासाठी धान्यादी मालाचे प्रमाण जे निश्चित करून देत आहेत त्याप्रमाणे पोषण आहार देण्यात यावा.[ads id="ads2"]
तांदूळ,मसूरडाळ,हरभरा, वाटाणा,कांदा,लसूण,मसाला, मिरची पावडर,हळद पावडर, मीठ,जिरे-मोहरी ऍगमार्क सोयाबीन खाद्यतेल धान्यादी माल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी करिता दिलेले प्रमाण, आणि इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी करिता दिलेले प्रमाणानुसार पोषण आहार देण्यात यावा असे आदेश आहेत.
शालेय पोषण आहार दररोज शिजवून तयार करावयाच्या आहारातील पाककृती पुढील प्रमाणे
सोमवार या दिवशी मसुरडाळीचे फोडणीचे वरण व भात.पालेभाज्या :- पालक, मेथी, टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, शेवग्याच्या, शेंगा,कोथंबीर,
कढीपत्ता,कांदा,लसुन,इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
मंगळवार-हरभरा उसळ व भात पालेभाज्या :- पालक, मेथी, टमाटे,बटाटे, पत्ताकोबी, शेवग्याच्या शेंगा,कोथंबीर, कढीपत्ता,कांदा,लसुन, इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
बुधवार-वाटाणा उसळ व भात
पालेभाज्या : पालक, मेथी, टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, शेवग्याच्या शेंगा,कोथंबीर, कढीपत्ता,कांदा,लसुन,इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
गुरूवार-हरभरा उसळ व भात
पालेभाज्या : पालक,मेथी, टमाटे,बटाटे,पत्ताकोबी,शेवग्याच्याशेंगा,कोथंबीर,कढीपत्ता, कांदा,लसुन,इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर
उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
शुक्रवार -वाटाणा उसळ व भात
पालेभाज्या :- पालक, मेथी, टमाटे,बटाटे,पत्ताकोबी, शेवग्याच्या शेंगा,कोथंबीर, कढीपत्ता,कांदा,लसुन,इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
शनिवार -मसुरडाळ व तांदूळ खिचडी पालेभाज्या:-पालक, मेथी,टमाटे,बटाटे,पत्ताकोबी, शेवग्याच्या शेंगा,कोथंबीर, कढीपत्ता,कांदा,लसुन,इत्यादी तसेच याव्यातिरिक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या इतर भाज्या.
तसेच आठवड्याच्या दर बुधवारी एक वेळा नियमित मध्यान्ह भोजना सोबत पूरक पोषण आहार देण्यात यावा बुधवारी सुट्टी असल्यास लगतच्या दुसऱ्या शाळेच्या दिवशी पूर्वक आहार देण्यात यावा त्यात उकडलेली अंडी/ सोया / बिस्कीट/ राजगिरा/ लाडू /गुळ /शेंगदाणे/ खजूर/ मुरमुरा/ चिवडा इत्यादी पैकी एक देण्यात यावे.
याप्रमाणे जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आदेश दिले होते आणि आहेत. यानुसार प्रत्येक शाळेत योग्य प्रमाणात पोषण आहार दिला जात आहे का..? आणि याची प्रत्यक्ष खात्री यावल गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी किती वेळा आणि कोणकोणत्या शाळेत केली आहे..? आणि ज्या शाळांनी वरील लेखी आदेशानुसार पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला नाही त्यांच्यावर कारवाई काय केली..? तीन-चार दिवसांपूर्वी ऑनलाइन चुकीचा रिपोर्ट दिलेल्या शाळेविरुद्ध काय कारवाई केली..? तसेच त्या एका शाळेने दिलेल्या खुलासात काय म्हटले आहे..? इत्यादी अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहेत,शालेय पोषण आहार वाटप करताना पारदर्शकता यावी म्हणून गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात धडक मोहीम राबवुन शाळांमध्ये अचानक भेट देऊन पोषण आहार योग्य प्रमाणात व निश्चित केलेल्या साहित्यानुसारच दिले जात आहे किंवा नाही? शाळेत आलेले धान्य साहित्य पुरवठा मिळाल्यानुसारच आहे किंवा नाही,काही शाळा धान्यादी माल पुरवठा ज्या दिवशी होतो त्याच दिवशी त्याच वाहनात बाजारात विक्रीसाठी रवाना करीत असतात असे तालुक्यात बोलले जात आहे आणि शिक्षणाधिकारी शाळेला पुरवठा झालेला धान्यादी माल प्रत्यक्षात किती आला आणि शिल्लक किती याबाबतची खात्री करीत नसल्याने काही शाळांच्या आणि शिक्षण अधिकाऱ्यांचे संगम मत आहे का..? प्रश्न उपस्थित केले जात असल्याने शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.