होतकरू ३४ मुला/मुलींना स्वातंत्र्य दिनी शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप : समाज हित जोपासण्याचचा असाही प्रयत्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


      यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील बोराळे या लहानश्या गावात,जगाला शांततेचा संदेश देणारे, महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती पासून चालू करण्यात आलेल्या समाज मंदिर (विहार) बोराळे गावात,नियमित सकाळी ७ वाजता बौद्ध पुजा पाठ व संध्याकाळी ठीक ५:०० वाजता १ली ते ८ पर्यंत (फ्री क्लास) मध्ये,१५ ऑगस्ट २०२३ भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गावातील धम्म बंधू आयु.भिमराव सुका वानखेडे यांच्या वतीने त्यांचा नातू आयु.जिग्नेश विकी वानखेडे याच्या हस्ते,तसेच किंनगांव येथील माझे मित्र आयु.संभाजी भाऊ पालवे यांनी दिलेल्या उजळन्या,क्लास मध्ये नियमित येणाऱ्या,हुशार होतकरू ३४ मुला/मुलींना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.[ads id="ads1"] 

      नवीन पर्वाची वाटचाल म्हणून चालू करण्यात आलेली मोहीम काबीज व्हावी म्हणून,मी व माझ्या सोबत कार्य करत असलेले माझ्या वाड्यातील धम्म बांधव यांच्या प्रयत्नमुळे आज सफलता मिळत आहे,क्लास चालू करण्याचा जो उद्देश असा की गावातील अनेक मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,त्यांचे मनोबल वाढावे तसेच बौद्ध वस्तीतील मुला/मुलींना धम्माची जाणीव व्हावी म्हणून हे केंद्र/क्लास चालू करण्यात आला आहे.[ads id="ads2"] 

       सदर कार्यक्रमात पुढील प्रमाणे घोषणा देखील करण्यात आली, येत्या पंधरा दिवसात याच ठिकाणी चुंचाळे व बोराळे गावातील भरती तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नवतरुण मुला/मुलींसाठी फुले,शाहू आंबेडकर नावाने अभ्यासिका देखील चालू करण्यात येणार असून ज्या बंधू/भगिनींना अभ्यास करण्यास उपयोगी वस्तू द्यायच्या असतील त्यांनी देखील सहकार्य करावे,पैसे न देता वस्तू रुपी तसेच महापुरुषांचे पुस्तके भेट देण्यात यावी,जेणे करून अभ्यास करण्यास उपयोग होईल.


     सदर वेळ प्रसंगी,भिमराव सुका वानखेडे,विवेकानंद मुरलीधर तायडे,शंकर सावळे,शिवाजी गजरे,विकी वानखेडे,राजू सोनवणे,अमर वानखेडे आदी उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद मुरलीधर तायडे यांनी केले तर आलेल्या बांधवांचे आभार सुपडू संदानशिव यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!