ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे नुकतेच युवतीसभेचे उदघाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रस्तुत कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बि. अंजने यांनी केले प्रास्ताविक युवती सभा सचिव डॉ नीता वाणी यांनी केले आपल्या प्रस्ताविकात त्यांनी युवती सभेची स्थापनेचा उद्देश, आयोजित करावयाचे कार्यक्रम याबाबत माहिती दिली विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रामटेके, युवती सभा सचिव डॉ. नीता वाणी, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. उमरीवाड, प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी युवतीसभेच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करून समाजमुल्याचे भान ठेऊन शिक्षण घ्या आपले कॅरेक्टर लॉस होणार नाही यांची काळजी घ्या ते स्ट्रॉंग बनवा आदर्श स्त्रीयांचे दाखले त्यांनी विद्यार्थीनीना दिले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बि अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्त्री शिक्षणाचे महत्व सांगितले तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्त्रियांची उदाहरणे देऊन तुम्ही ज्ञानवंत बना, नितिवंत बना असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी महाजन हिने केले प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. प्रदीप तायडे, हर्षल महाजन, श्रेयस पाटील यांनी सहकार्य केले प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनी आभार मानले.



