हिंगोण्यात कै.हरिभाऊ जावळे केळी महामंडळाची स्थापना करावी : राष्ट्रवादी रावेर तालुकाध्यक्ष राजेश वानखेडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

 सावदा :- यावल तालुक्यात असलेल्या हिंगोणा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत टिशू कल्चर प्रयोगशाळा प्रकल्प स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांची ७० एकर उपजाऊ जमीन विद्यापीठास हस्तांतरीत केलेली आहे.मात्र विद्यापीठाने हा प्रकल्प रद्द केल्याने ही जमीन पडून आहे.  जळगाव जिल्ह्यातील जवळपास ७५% ३५,००० हेक्टर केळीचे क्षेत्र हे एकट्या रावेर-यावल तालुक्यात असल्याने याच तालुक्यांत केळीवर संशोधन व सुविधा प्रकल्प स्थापन झाल्यास त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. [ads id="ads1"] 

  सद्यस्थितीत जळगाव येथे  म.फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्र कार्यरत असून त्याचा जास्तीच्या अंतरामुळे पाहिजे तसा फायदा रावेर-यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना घेता येत नाही.म्हणून प्रस्तावित ''हरिभाऊ जावळे केळी महामंडळ'' हिंगोणा या गावी स्थापन झाल्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त म्हणजे रावेर, यावल,चोपडा,मुक्ताईनगर या प्रमुख केळी उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे संशोधन व सुविधांचा लाभ घेणे सोयीचे होईल.तसेच येथील स्थानिक वातावरणात संशोधन झाल्यास त्याचा प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांना सुद्धा होईल.[ads id="ads2"] 

  तरी सर्व बाबींचा व उपलब्ध जागेचा विचार करता नियोजित''कै हरिभाऊ जावळे केळी महामंडळ''  कृषिमित्र कै.हरिभाऊ जावळे यांच्याच कर्मभूमीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत हिंगोणा,या गावात करावी.अशी रास्त मागणी आज दि.१९ ऑगस्ट रोजी थेट जिल्हाधिकारी जळगाव यांची समक्ष भेट घेऊन  सावदा न.पा.मा.नगराध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महा. पशु व मतस्य विज्ञान विद्यापीठ नागपूर चे सदस्य राजेश गजानन वानखेडे यांनी निवेदनाद्वारे केली असून सदरील विषय लवकरच मार्गी लागल्या शिवाय राहणार नाही,अशी प्रतिक्रिया रावेर यावल तालुक्यातील केळी उत्पादक व शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!