माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ यांच्या प्रयत्नाने आळंदी येथे प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्ती पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


  रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरी कोळी

       माजी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ यांच्या प्रयत्नाने तसेच प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी  तसेच उत्तर महाराष्ट्र दिव्यांग संघटना अध्यक्ष प्रदीप दिघे साहेब यांच्या उपस्थितीत आज दिनांक 19 /08/2023 या रोजी  पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भव्य रोजगार मेळावा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये दहावी आणि बारावी पास तसेच पदवीधर दिव्यांग व्यक्तींना प्रायव्हेट सेक्टर नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण देण्यात येईल असे स्पष्ट मत बच्चुभाऊंनी यावेळी व्यक्त केले आहे.[ads id="ads1"] 

    या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रहार दिव्यांग संघटना तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती हजारोच्या संख्येने होती. प्रशिक्षण शिबिर मराठा हॉल आळंदी येथे घेण्यात आले .यात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग बांधव विधवा महिला तसेच गोरगरिबांचे दैवत बच्चू  भाऊ यांनी यांच्यासाठी केलेल्या कामाची पावती  पदाधिकारी यांनी आपल्या शब्दात व्यक्त केली.[ads id="ads2"] 

      जळगाव जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जळगाव जिल्ह्यातील काही बाबी बच्चु भाऊ यांच्या लक्षात आणून दिल्या तसेच त्या प्रकारचे लेखी निवेदनही दिले. 

 त्या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संपर्कप्रमुख रामदास खोत साहेब महाराष्ट्र राज्य दिव्यांग अध्यक्ष बापूराव काने साहेब. प्रहार जनशक्तिचे उत्तर महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख दत्तुभाऊ बोडके ,महाराष्ट्र राज्य दिव्यांग उपाध्यक्ष अभय पवार साहेब.

तसेच सर्व महाराष्ट्र राज्य दिव्यांग कार्यकारणी सदस्य, प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश दादा पाटील प्रहार जनशक्ती रावेर तालुकाध्यक्ष पिंटू धांडे, अल्पसंख्यांक ड्रायव्हर तालुका अध्यक्ष वसीम शेख प्रहार दिव्यांग उपजिल्हाध्यक्ष राजू दादा जाधव दिव्यांग जिल्हा सचिव धर्मराज पाटील प्रहार दिव्यांग रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी प्रहार दिव्यांग चाळीसगाव तालुका अध्यक्ष निळकंठ साबणे तालुकाध्यक्ष मनीषा ताई पाटील पाचोरा दिव्यांग तालुकाध्यक्ष महेश गौंड पारोळा तालुका सल्लागार सुधाकर पाटील रावेर तालुका दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील मुक्ताईनगर दिव्यांग तालुकाध्यक्ष उत्तम दादा जुम्बळे  . दिव्यांग तालुकाध्यक्ष एरंडोल योगेश चौधरी हिरापूर शाखाप्रमुख वाल्मीक खैरनार कासोदा शाखाप्रमुख गणेश पाटील सुधाकर पाटील. तसेच बरेचसे प्रहार पदाधिकारी कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!