जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मिडीयम स्कूल रावेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मिडीयम स्कूल रावेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
चिमुकल्यांनी साकारली हुबेहूब राधा - कृष्णाची वेशभूषा

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मिडीयम स्कूल रावेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर दहीहंडी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  त्यावेळी श्रीकृष्ण  प्रतिमेचे व दहीहंडी चे पुजन संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत झटकार सर यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]

शाळेतील सर्व लहान विद्यार्थी व विद्यार्थिनीं श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभुषेत तयार होऊन आले होते.  या कार्यक्रमात इ. 4थी ते 7वी च्या मुले व मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला . सर्व प्रेक्षकांनी टाळ्या  वाजवून त्यांचे  कौतुक केले.  तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता सावळे यांनी विद्यार्थांना बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला या विषयावर मार्गदर्शन करून "श्रीकृष्ण जन्माष्टमी" उत्सवाचे महत्त्व या विषयी  विद्यार्थांना  मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत झटकार सर हे होते.गोपाल कृष्ण भगवान कि जय, हाथी घोड़ा पालखी जय कन्हैयालाल की अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमला होता. दहीहंडी  फोडण्याचा मान इ. 5 वीतील विद्यार्थी  कुणाल वानखेडे याने पटकावला तर इ.5 वी ते इ.7 वी च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीसाठी मानवी मनोरा तयार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री धनगर मॅडम व जयश्री साळुंके मॅडम यांनी केले. तर आभार सौ.नंदा जंगले मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!