ट्रकने चिरडल्याने रावेर तालुक्यातील युवक जागीच ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आपल्या दुचाकीने कामावर जात असलेल्या मनोहर ऊर्फ मनोज कडू वाघ वय 29 राहणार अहिरवाडी ता. रावेर जि.जळगाव) या दुचाकीस्वार तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची दुर्घटना दिनांक 5 सप्टेंबर  मंगळवारी  रोजी सकाळी हा अपघात रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावाजवळ  झाला. मयताची पत्नी गर्भवती असून, लवकरच प्रसूती होणार असल्याची माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, त्यापूर्वीच तरुणावर काळाने घाला घातला.[ads id="ads1"]

याबाबत त्याच्या  नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी मनोहर ऊर्फ मनोज वाघ हा मंगळवारी सकाळी दुचाकीने निरुळ येथे कामावर जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर मोटार सायकल वरून रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.[ads id="ads2"]

 अपघाताची माहिती मिळताच मयत मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात दाखल केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. विनोद वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!