स्थापत्य अभियंता यांच्या कार्यकाळात मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार
यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषद कार्यालयात एकूण महत्त्वाची 10 पदे रिक्त आहेत.त्यामुळे यावल नगर परिषदेच्या कामकाजावर मोठा विपरीत परिणाम झाला, नागरिकांच्या विविध समस्या तक्रारी सोडविल्या जात नसल्याने, तसेच यावल नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्या कार्यकाळात साठवण तलावासह विकसित भागात टाकलेल्या पाईपलाईन व इतर अनेक बांधकामांमध्ये मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याने तसेच त्यांची नुकतीच पदोन्नतीसह बदली झाल्याने यावल शहरात शासन प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.ads id="ads1"]
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून प्रभारी आहेत,5 लिपिकांच्या जागा रिक्त आहे,तीन वरिष्ठ लिपिक नाहीत,बांधकाम विभाग स्थापत्य अभियंता यांची 15 सप्टेंबर 2023 रोजी पदोन्नतीवर बदली झाली.कर निरीक्षक नाही. टाऊन प्लॅनिंगचा कर्मचारी नाही.हे दहा-बारा कर्मचाऱ्यांच्या टेबलवर कर्मचारी नसल्याने यावल नगरपालिकेच्या महत्त्वाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे ठराविक कामे ठेकेदार आपल्या सोयीनुसार आणि हितसंबंधांमुळे आपल्या मर्जीनुसार करीत आहे.ads id="ads2"]
स्थापत्य अभियंता योगेश मदने यांनी यावल नगरपालिकेत कोणती कर्तव्य दक्षता बाळगून कामे केली..? साठवण तलाव,नवीन कॉलनीतील पाईपलाईन रस्त्याची बोगस कामे इत्यादी कामाबाबत नागरिकांच्या लेखी तक्रारी असताना स्थापत्य अभियंता यांना पदोन्नती कोणत्या निकषानुसार मिळाली आणि त्यांच्या कामाबाबतच्या चौकशीचे काय..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याला जबाबदार संबंधित मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई होऊ शकते..! आणि नुकतेच बदली होऊन आलेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल नगरपालिकेच्या संपूर्ण कारभाराची आणि तक्रारीची सखोल चौकशी केल्यास यावल नगरपालिकेचा फार मोठा भोंगळ,गैरप्रकार, भ्रष्टाचार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.