यावल (सुरेश पाटील)
यावल नगरपरिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून यावल शहरातील शहराच्या मध्यवर्ती भागात टी पॉईंट येथे यावल नगरपरिषद व आदिवासी मुलींचे वस्तीगृह यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता पर पथनाट्य सादर करण्यात आले.[ads id="ads1"]
त्यात शहरातील स्वच्छता संदर्भात महत्व पटवून देण्यात आले.व घरातील कचरा सुका व ओला वेगळा करून द्यावा. प्लास्टिक पिशवी मुक्त शहर हगणदारी मुक्त शहर कसे होईल याचे महत्व सांगितले सदरचा उपक्रम नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता सत्यम पाटील साहेब आरोग्य निरीक्षक नितेश चांगरे शहर समन्वयक स्नेहा रजाने मुकादम शेख मोबीन प्रभारी मुकादम दिलीप बारसे व विभागातील सफाई कर्मचारी व इतर समाजसेवक व नागरिकांचा सहभाग होता. नगरपरिषदेच्या या उपक्रमास यावल शहरात सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.