यावल(सुरेश पाटील) यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहराजवळ १ ते २ किलोमीटर अंतराचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम ऐन पावसाळ्यात सुरू झाले आहे. बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या साईट पट्ट्यावर मुरूम खडी इत्यादीचा भराव न टाकल्यामुळे वाहनधारकांसाठी पर्यायी व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात न केल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांना नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने तसेच आज शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भुसावळ करून यावल कडे येणारा एक ट्रक साईट पट्ट्यांवर असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणी येत आहेत. [ads id="ads1"]
वाहनधारकांची पर्यायी व्यवस्था व्यवस्थित न केल्यामुळे संबंधित बेशरम यंत्रणा नागरिकांचे वाहनधारकांचे अतोनात हाल करीत असल्यामुळे आणि स्वतःला काही समस्या लोकप्रतिनिधी समजून घेणारे गप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव जिल्हाधिकारी आज यावल शहरात
कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब आज शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी यावल शहरात येत असून यावल तहसील कार्यालयात महसूल चा आढावा घेणार असल्याने त्यांनी सर्वात प्रथम तत्कालीन तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यात महसूल मध्ये दिलेल्या सर्व आदेशाची चौकशी केल्यास आणि त्यांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण केल्यास अनेक प्रकार अनियमितपणा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही.[ads id="ads2"]
तसेच नगरपालिका विभागात विकास कामांचा आढावा घेतल्यास निकृष्ट कामांची मालिका दिसून आल्याशिवाय राहणार नाही,यावल- भुसावळ रस्ता आणि यावल- चोपडा रस्ता आणि आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,नगरपरिषद बांधकाम विभाग,आदिवासी क्षेत्रातील बांधकामे प्रत्यक्ष बघितल्यास कॉन्ट्रॅक्टर यांचे शासकीय निमशासकीय यंत्रणेशी तसेच क्वालिटी कंट्रोल,टेस्ट रिपोर्ट देणारे यांचे एकमेकाशी कसे हितसंबंध आहेत हे दिसून येतील असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.