सेवानिवृत्त डीवायएसपी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले माझी नातवंड त्याचप्रमाणे कॉन्व्हेंट शाळेमधील विद्यार्थी चांगल्या दर्जाचे दप्तर घेऊन शाळेत जातात. परंतु माझ्या जिल्हा परिषदेतील शाळा शाळेतील विद्यार्थी हा थैलीमध्ये, बियाण्यांच्या थैलीमध्ये दप्तर घेऊन जाताना मला दिसतो. त्यामुळे माझ्या मनाला वाईट वाटते. म्हणून आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुद्धा हा दप्तर घेऊन शाळेत गेला पाहिजे म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट दर्जाचे विद्यार्थ्यांना चार वर्षांपर्यंत टिकेल असे शालेय दप्तर भेट दिले. त्याचप्रमाणे या शाळेतील उपक्रमशील शिक्षक समाधान जाधव यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील एवढ्या वही, पाटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, सचित्र बालमित्र पुस्तक हे मैत्री फाउंडेशन नाशिकच्या वतीने वतीने मिळवून दिलेले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणिक साहित्य घेण्याची गरज नाही. आपण आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊन भारताचे, उत्तम नागरिक घडवा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे.पी. सपकाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या शालेय दप्तराचा वापर फक्त शाळेतच करावा. गावाला जाण्यासाठी दप्तराचा वापर करू नये. म्हणजेच तुम्हाला चार वर्षापर्यंत टिकेल असे उत्कृष्ट दर्जाचे दिलीप सूर्यवंशी यांनी दप्तर दिलेले आहे. या शाळेतील चारही शिक्षक हे उपक्रमशील आहेत. शाळेच्या विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी लोकसहभागातून अनेक शैक्षणिक कार्य या शाळेत केलेले दिसून येत आहे. त्यांनी सर्व शिक्षक यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद शिंदी शाळेत नेहमी लोकसभागातून अनेक कामे होत असतात त्याबद्दल भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांचे विशेष कौतुक केले. कारण त्यांनी लोकसहभागातून या शाळेतील पाच वर्षाच्या सेवेमध्ये अनेककार्य केले आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक यांचे कौतुक करून अभिनंदन केले. शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी.डी. धाडी यांनी सुद्धा शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी पाटील यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षिका प्रीती फेगडे शालेय पोषण आहार स्वयंपाकी प्रमिला पाटील, मदतनीस देवका राजपूत यांनी परिश्रम घेतले.


