यावल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आयुष्मान भव कार्यक्रमाचे उदघाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आयुष्मान भव कार्यक्रमाचे उदघाटन


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

येथिल यावल तालुका आरोग्य कार्यालयामध्ये दिनांक :- 13/09/2023 रोजी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुष्मान भव कार्यक्रमाचे उदघाटन धन्वंतरी फोटो चे पूजन करून करण्यात आहे.[ads id="ads1"]

राष्ट्रीय आयुष्मान भव या कार्यक्रमा अंतर्गत  तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना व उपकेंद्र स्थरावर आयुष्मान भव आज पासुन सप्ताहाची सुरुवात अवयव दानाची व क्षयरोग मुक्त भारत करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येऊन आयुष्यमान भव कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, सागर तपासणी, रक्त दाबाची तपासणी, क्षयरोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी, रक्तदान शिबीर, अवयव दान शिबीर यांचे आयोजन  दिनांक :- 17/09/2023 ते दिनांक :- 02/10/2023 पर्यंत या सप्ताहात करण्यात येणार आहे.[ads id="ads2"]

  तरी तालुक्यातील नागरिकांनी या सप्ताहामध्ये सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांनी केले असुन यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची दिनांक :- 13/09/2023 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सभा घेऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय  अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल चौधरी, डॉ. स्वाती कवडीवले, डॉ. नितीन सोनवणे, डॉ प्राजक्ता चव्हाण, व तालुका आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक जयंत पाटील, तालुका समूह संघटक प्रतिभा ठाकूर, तालुका क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, तालुका कनिष्ठ सहाय्यक संतोष भंगाळे, तालुका लेखापाल आशिष शिंदे, तालुका संघणक चालक प्रशांत शिंपी, शकील तडवी, अमित तडवी, मिलिंद जंजाळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!