यावल ( सुरेश पाटील ) जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांच्या संकल्पनेतून यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पोस्ट कार्ड घेऊन त्यावर आपल्या पालकास पत्र लिहिले.आणि त्या पत्रामध्ये मजकूर लिहिला की त्यांना त्यांचे शिक्षण चालु ठेवून आयुष्यात काय व्हायचे आहे कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवायचे आहे,कोणत्या विभागात कोणता अधिकारी व्हायचे आहे,जेणेकरून त्यांना शाळेतील दैनंदिन अभ्यास करण्यासाठी शाळा सोडावी लागू नये.त्यांना भविष्यात कोणते करिअर करायचे आहे.[ads id="ads1"]
त्यांना भविष्यात काय बनायचे आहे किंवा त्यांची काय इच्छा आहे इत्यादी अपेक्षा मुला मुलींनी पोस्ट कार्ड लिहून आपल्या पालकांना कळविले .
तसेच १५ ऑगष्ट २०४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण होईल . त्या दृष्टीने देशाच्या विकासात माझे काय योगदान राहिल या बाबत ही पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.[ads id="ads2"]
सदर पत्र मुलींनी एकत्र करून विषय शिक्षक राजेद्र फालक व सविता वारके यांच्या मदतीने यावल पोस्ट ऑफिस पत्रपेटी त टाकले.