रावेर तालुका प्रतिनिधि - विनोद हरी कोळी
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षक दिनानिमित्ताने विविध वर्गातील व विविध विषयाच्या विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये शिकविण्याचे काम केले. [ads id="ads1"]
तसेच या शिक्षक दिनानिमित्ताने ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर या संस्थेचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील, उपाध्यक्ष रामदास नारायण महाजन, चेअरमन श्रीराम नारायण पाटील, सचिव संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भागवत भाऊ पाटील यांनी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांना टोपी, रुमाल व पुष्प देऊन सन्मानाने स्वागत करण्यात आले. [ads id="ads2"]
आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये असे सांगितले की शिक्षक हा पहिला गुरु आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी प्राध्यापकांचा सन्मान हा आपला सन्मान तसेच संस्थेचा सन्मान आहे. असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. एस. ए. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मान्यवरांचे आभार डॉ. जे.पी. नेहेते यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.