जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे शिक्षकदिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत झटकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता झटकार मॅडम ह्या होत्या.

5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर या ठिकाणी देखील 5 सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत झटकार सर यांच्या उपस्थितीत पार पडला.[ads id="ads1"] 

शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव जीनियस किड्स अ प्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कुल रावेर च्या विद्यार्थांना देण्यात आला. इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या नर्सरी ते चौथीतील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.[ads id="ads2"] 

   थोडक्यात 5 सप्टेंबर या दिवशी पूर्ण शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी व  शिकणाऱ्या इतर  विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. संस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत झटकार सर यांनी देखील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता झटकार मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना आता समजले असेल की शिक्षकांना त्रास देणे कसे चुकीचे आहे ! हे वाक्य ऐकून सर्व विद्यार्थी गप्प झाले. सर्व विद्यार्थ्यांनी शब्द दिला की, यापुढे आम्ही शिक्षकांच्या तासाला मस्ती करणार नाही.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील कॉर्डिनेटर सौ.नंदा जंगले मॅडम यांनी सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षक आणि एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे आणि इतर सर्वच  विद्यार्थ्यांचे आभार मानले. शिक्षक दिन हा दिवस आमच्यासाठी कसा मजेशीर  असतो. या विषयी आपले अनुभव देखील मांडले. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी यश थाटे व ज्ञानेश पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!