यावल - भुसावळ रोडवर जिवित हानी झाल्यावरच खड्डे बुजविणार का..? ठेकेदार,अधिकारी लोकप्रतिनिधी समन्वयाचा विपरीत परिणाम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) अत्यंत कमी पाऊस असताना सुद्धा यावल भुसावळ रस्त्याचे बारा वाजले आहेत यावल शहरापासून २००ते ३०० मीटर अंतरावर तसेच त्यापुढे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने,रस्त्याच्या आजूबाजूच्या साईट पट्ट्या गायब झाल्याने,आणि रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची पर्यायी व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने न केल्याने, साईट पट्ट्यांच्या बाजूला काटेरी झाडे झुडपे न तोडल्यामुळे,निमगाव जवळ नवीन पुलाजवळ पूर्ण काम न केल्यामुळे यावल तालुक्यातील सर्व वाहनधारकांमध्ये नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या रस्त्यावर जीवितहानी झाल्यानंतर खड्डे बुजविले जाणार का..? किंवा यावल भुसावळ रस्त्याची डाग-डुजी  केव्हा होईल असे अनेक प्रश्न प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात असून अधिकारी ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधींच्या चुकीमुळे मात्र नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]

        यावल शहरापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर यावल भुसावल रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तर्फे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम एका ठेकेदारा मार्फत सुरू झाले,ठेकेदाराने या ठिकाणी त्याची संपूर्ण मशिनरी सुद्धा आणून ठेवली पहिल्याच दिवशी पाऊस पडल्याने 100 ते 200 मीटर अंतरावर टाकलेले सिमेंट,खडी मिक्स मटेरियल पावसामुळे वाहून गेले,सिमेंट काँक्रीटचा रस्ता कोणत्या निधीतून.? कोणामार्फत..? आणि कोणता ठेकेदार करीत आहे कामाचे नाव,कामाची रक्कम किती..? कामासाठी लागणारा कालावधी काय..? याचा फलक सुद्धा ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी लावला नाही.कामामध्ये ठरल्याप्रमाणे संबंधितांना टक्केवारी मिळत असल्याने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही,सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम सुरू झाल्याने तीन-चार राज्यातून या रोडवर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक, आणि जिल्ह्यात होणारी नियमित वाहनांची वाहतूक असल्याने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ठेकेदारांमार्फत पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे अर्धा-अर्धा तास त्या ठिकाणी ट्राफिक जाम होत आहे.[ads id="ads2"]

   रस्त्याचे काम सुरू असताना एका बाजूने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या साईट पट्ट्यावर मटे रियल टाकून वाहने जाण्या येण्याची पर्यायी व्यवस्था अधिकारी आणि ठेकेदाराने करायला पाहिजे असा नियम आहे,परंतु ठेकेदार,अधिकारी यांचा समन्वय असल्यामुळे आणि अनेक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने या रोडवर जागोजागी जे मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी जीवित हानी किंवा एखादी मोठी अप्रिय घटना घडल्यानंतरच मोठमोठे खड्डे बुजवले जाणार आहेत का..? असे संताप जनक प्रश्न वाहनधारकांमध्ये नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहेत.

-------------------------------------

यावल भुसावळ रस्त्यावर अपडाऊन करणारे 90% अधिकारी,कर्मचारी, लोकप्रतिनिधी गेंड्याच्या कातडीचे..?

         यावल येथे वन विभाग, तालुका कृषी कार्यालय,हतनूर पाटबंधारे विभाग,सार्वजनिक बांधकाम उपविभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,यावल ग्रामीण रुग्णालय,पोलीस कर्मचारी,तालुका भूमी अभिलेख,दुय्यम निबंधक, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग,यावल नगरपरिषद यावल पंचायत समिती,

सहाय्यक निबंधक,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इत्यादी कार्यालयासह इतर अनेक कार्यालयात जळगाव- भुसावळ येथून किंवा यावलहून भुसावल - जळगाव कडे जाणारे 90% अधिकारी कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी रोज अपडाऊन करीत आहेत यांना या रस्त्यावरून येताना जाताना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत परंतु गेंड्याच्या कातडी प्रमाणे यांना कोणताही त्रास होत नसल्याने ते दररोज मुकाट्याने ये जा करीत आहेत यातील बरेच जण आमदार,खासदार,मंत्री यांच्याशी संबंधित असल्याने या रस्त्याबाबत कोणीही तक्रारी करीत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!