भुसावळ तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सर्व शिक्षक संघटनांची तक्रार निवारण सभा संपन्न : यापुढे दर दोन महिन्यांनी होणार तक्रार निवारण सभा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

भुसावळ तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सर्व शिक्षक संघटनांची तक्रार निवारण सभा संपन्न : यापुढे दर दोन महिन्यांनी होणार तक्रार निवारण सभा


भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :भुसावळ तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सर्व संघटनांची तक्रार निवारण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती सभागृह येथे भुसावळ तालुका गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्या, समस्या, प्रश्न मांडण्यात येऊन त्यावर चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. [ads id="ads1"]  

  तक्रार निवारण सभेमध्ये पगारातून कपात होणाऱ्या रकमेचे भुसावळ, जळगाव सोसायटी एलआयसी चे चेक वेळेवर देणे, शिक्षकांची मेडिकल बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक, सेवानिवृत्त शिक्षक यांच्या विविध रकमा यांची जिल्हास्तरावर मागणी करावी, सहावा वेतन, आयोग सातवा वेतन आयोग सेवा पुस्तकाची पडताळणी करणे, दप्तर दिरंगाईबाबत कारवाई करणे, सन 2022 -23 चा गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मिळणे आणि आत्तापर्यंत असलेल्या गोपनीय अहवालांची संपूर्ण शिक्षक निहाय फाईल तयार करणे, शासकीय परिपत्रके, सेतू पेपर परीक्षा, निपुण चाचणी परीक्षा पेपर ही तालुकास्तरावरून मिळणे, सर्व शिक्षा अभियानचे अनुदान शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जमा करणे, शाळेचे वीज बिल भरण्याबाबत ग्रामपंचायतींना पत्र काढणे, चालू वर्षाचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव तयार करून जिल्हा स्तरावर पाठवणे, तक्रार निवारण सभा दर दोन महिन्यांनी घेणे व सभेचे इतिवृत्त सर्व संघटनांना मिळणे, शालेय पोषण आहार तांदूळ, धान्यदीमाल शालेय वेळेत मिळणे, सेवा पुस्तकांमध्ये नोंद असलेल्या दिव्यांग शिक्षकांनाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे ज्या शिक्षकांची नोंद नसेल अशा शिक्षकांना लाभ देण्यात येऊ नये, दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामी आदेश देऊ नये, दिव्यांग कर्मचारी यांना सहानुभूतीपूर्वक वर्तन करणे याप्रमाणे सर्व विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्या सोडवण्यासाठी आश्वासन देण्यात आले. [ads id="ads2"]  

  गटविकास अधिकारी अतुल पाटील साहेब यांनी मार्गदर्शन करताना हक्कांसोबतच आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. सर्वांनी शाळेच्या वेळेत शाळेत जाणे येणे केले पाहिजे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. बाला उपक्रमासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगातून भुसावळ तालुक्यातील सर्व शाळांना अनुदान उपलब्ध करून दिला असून त्यातून शाळांचा विकास करण्यासाठी काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान बळीराम धाडी, पंचायत समिती कक्ष अधिकारी संजय काळे, वरिष्ठ कक्ष अधिकारी भास्कर चिमणकर, लेखा विभागाचे चव्हाण, आराख कर्मचारी उपस्थित होते. 

  आणि भुसावळ तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव यांची उपस्थिती होती. यामध्ये गणेश फेगडे, राजेंद्र ढाके, समाधान जाधव, प्रदीप सोनवणे, मीरा जंगले, लीना अहिरे, अतुल पाटील, प्रमोद खैरे, सूर्यकांत घुले, सुधीर तायडे, कमलेश शामकुवर, प्रमोद गांधेले, विनायक भोगे, नामदेव महाजन हे पदाधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप सोनवणे यांनी केले तर आभार विनय भोगे यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!